ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज पुजा केल्याने देवी देवतांचा आशिर्वाद मिळतो. यासोबतच जीवनातील अनेक समस्याही दूर होतात.
पुजा करताना डोळ्यात अश्रू येणे याला शुभ संकेत मानले जाते.
पुजा करताना डोळ्यात अश्रू येणे म्हणजेच तुम्हाला तुमच्या पुजेचा फळ मिळणार आहे.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून त्रास सहन करत असाल आणि प्रार्थना करताना तुमच्या डोळ्यातू अश्रू येऊ लागले तर लवकरच तुमच्या समस्येचे निर्वाहन होणार आहे.
प्रार्थना करताना डोळ्यात अश्रू येणे म्हणजे देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झाले आहेत. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मकता येते.
आर्थिक संकटात असलेल्या लोकांनी पुजा करावी. अशावेळी डोळ्यातून अश्रू येणे म्हणजे लवकरच आर्थिक संकटातून मुक्तता होणार आहे.
जर तुम्हाला प्रार्थना करताना शिंका येत असेल तर याचा अर्थ तुम्हाला कामात यश मिळणार आहे.