Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नाआधी विविध प्रथा परंपरा केल्या जातात.
लग्नाआधी मुलगा व मुलगीला हळद लावण्याची परंपरा फार जुनी आहे.
लग्नाआधी नवरा आणि नवरीला हळद लावण्याचे कारण काय आहे जाणून घ्या.
सुखी जीवनासाठी नववधू वराला आशीर्वाद मिळावा यासाठी खास हळदीचा कार्यक्रम असतो.
हळदीचा रंग शुभ मानला जातो म्हणून नववधू वराला हळद लावली जाते.
हळदी समारंभ हा लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी केला जातो.
हळदीमध्ये तेल, पाणी, चंदन, गुलाबजल आणि बेसन मिसळून पेस्ट तयार केली जाते.
हळदीच्या कार्यक्रमात कुटुंबातील सर्व जण भाग घेतात. काही ठिकाणी हळदीसोबत पवित्र लाल धागा बांधला जातो.
हळदी समारंभ हा प्रत्येक समाजात आपल्या परंपरेनुसार होतो.