Surabhi Jayashree Jagdish
काही पुरुष असे असतात ज्यांना दाढी येत नाही. तर काहींचे दाढीचे केस फारच विरळ असतात. पण असं का होतं माहितीये का?
तुमच्या कुटुंबातील इतर पुरुषांची दाढी कशी आहे यावर तुमची दाढी अवलंबून असते. टेस्टोस्टेरॉनला प्रतिसाद देणारे केस वयात येताना जाड होतात. पण त्यांची जाडी आणि घनता ही पूर्णपणे जेनेटीकवर अवलंबून असते.
१८ ते ३० वयाच्या दरम्यान दाढी हळूहळू जाड आणि खरखरीत होत जाते. त्यामुळे लहान वयात दाढी कमी दिसली तरी काळजी करण्यासारखं कारण नाही. वेळेनुसार ती अधिक घनदाट होऊ शकते.
काही देशातील लोकांची दाढी पाहिली तर ती जास्त दाट असते. तर काही आशियाई लोकांची कमी असते. अभ्यासातून असं दिसून आलंय की, चीनच्या पुरुषांची दाढी तुलनेने विरळ असते.
हा एक केस गळतीचा आजार असून यामध्ये केस गोलसर ठिकाणी गळतात. याला दाढीही अपवाद नाही.
प्रोटीन, जीवनसत्वं कमी असतील तर केसांची वाढ कमी होते. संतुलित आहार नसेल तर दाढीचे केस विरळ असतात. योग्य पोषण मिळाल्यास केस अधिक निरोगी राहतात.
ताणामुळे केस गळती वाढते आणि दाढीची वाढ मंदावते. झोपेची कमतरता देखील केसांच्या वाढीवर परिणाम करते. गंभीर तणावामुळे तात्पुरते केस गळती होऊ शकते.
टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्य असली तरी दाढी विरळ असू शकते. पण खूपच कमी पातळी असल्यास दाढी अनेकांना येत नाही.