Ukadiche Modak Tricks: उकडीचे मोदकाच्या कळ्या नीट येत नाही? पीठ बनवताना वापरा 'हे' ट्रिक्स मोदक तुटणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोप्या टिप्स

गणपतीसाठी मोदक बनवताना उकड नीट होत नसेल तर काळजी नका करू. या सोप्या टिप्स वापरून मोदक पांढरेशुभ्र, मऊसूत आणि लुसलुशीत तयार करता येतील.

उकडीचे मोदक

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला प्रिय असलेला नेवैद्य म्हणजे उकडीचे मोदक. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात पूजा या गोड पदार्थाशिवाय अपूर्ण मानली जाते.

मऊसूत मोदक

उकडीचे मोदक करताना काही खास टिप्स पाळल्यास मोदक नेहमीच परफेक्ट, मऊसूत आणि स्वादिष्ट तयार होतील, तसेच त्यात कुठलीही चूक होणार नाही.

आंबेमोहर तांदूळ

सुंदर, पांढरेशुभ्र आणि आकर्षक उकडीचे मोदक हवे असतील तर योग्य तांदळाची निवड महत्त्वाची आहे. यासाठी आंबेमोहर तांदूळ सर्वोत्तम मानला जातो.

पीठ तयार करा

आंबेमोहर तांदळामुळे मोदकांना पांढरा रंग येतो आणि ते चिकटत नाहीत. तांदूळ नीट धुऊन वाळवा आणि त्याचे बारीक पीठ तयार करा.

तांदळाचे पीठ घाला

उकड काढताना एका ग्लास पाण्यात थोडे अधिक तांदळाचे पीठ घाला. पाणी उकळताना त्यात एक चमचा तूप व चिमूटभर मीठ मिसळा.

तूप

मोदकाचे सारण करताना गूळ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. कढईत तूप गरम करून त्यात किसलेला ओला नारळ आणि गूळ घालून परतून घ्या.

सुकामेवा घाला

सारणाला ओलावा येईपर्यंत परतून घ्या आणि नंतर त्यात वेलची पावडर, चिरलेले बदाम, काजू, पिस्ता आणि बेदाणे घालून नीट मिसळा.

पीठ मळून घ्यावे

मोदक उकळताना फाटू नयेत यासाठी पीठ ५-१० मिनिटे तेल लावून नीट मळावी. मोदक वळताना हाताला तेल लावल्यास आकार सुंदर मिळतो.

मोदकाचे सारण भरा

हातावर लहान पळी तयार करून त्यात मोदकाचे सारण भरा. नंतर ५-६ पदर काढून त्यांना नीट जोडा. हे करताना हाताला तेल लावणे आवश्यक आहे.

साचा वापरा

हाती मोदक वळणे कठीण वाटल्यास साचा वापरा. मोदकपात्रात दोन वाफा काढल्यास मोदक उत्तम शिजतात. नेवैद्य दाखवल्यावर गरम मोदकांवर तुपाची धार घालून आस्वाद घ्या.

NEXT: टम्म फुगणारे भोपळ्याचे घारघे घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

येथे क्लिक करा