Pumpkin Gharge Recipe: टम्म फुगणारे भोपळ्याचे घारघे घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Dhanshri Shintre

कृती

एका भांड्यात किसलेला भोपळा घालून त्यात गहू आणि तांदळाचे पीठ मिसळा आणि चांगले एकत्र करा.

साहित्य एकत्र करा

त्यात तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा किंवा जिरे आणि कोथिंबीर मिसळा.

पीठ मळून घ्या

पाणी न घालता, भोपळ्याचा रस वापरून कणिक मऊसर आणि एकसंध होईपर्यंत नीट मळा.

थालीपीठासारखे थापा

कणिकेतून लहान गोळे तयार करा आणि हातावर किंवा प्लास्टिक शीटवर थोडे पसरवून थालीपीठासारखे थापा.

तव्यावर शेकवा

तवा गरम करा, त्यावर थोडे तेल टाका आणि गोळे थोडे दाबून सावकाश तव्यावर शेकण्यासाठी ठेवा.

तळून घ्या

मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत घारघे हलक्या हाताने तळून घ्या.

सर्व्ह करा

गरमागरम भोपळ्याचे घारघे लोणचं, चटणी किंवा थंड दह्यासोबत सर्व्ह करून ताजेतवाने आणि स्वादिष्ट अनुभव घ्या.

NEXT: मोड आलेल्या कुळीथाची उसळ कशी बनवावी? जाणून घ्या झटपट सोपी रेसिपी

येथे क्लिक करा