Dhanshri Shintre
मोड आलेले कुळीथ, कांदे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, तेल, टोमॅटो, जिरे, हिंग, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर.
सर्वप्रथम कांदा, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.
प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात हिंग आणि जिरे घालावे.
जिरे तडतडल्यावर त्यात ठेचलेला लसूण घालून तो थोडासा लालसर होईपर्यंत परतावा.
त्यानंतर चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा परतल्यानंतर टोमॅटो घालून तोही मऊ होईपर्यंत परतावा. हळद घालून हलके परतावे, जेणेकरून हळदीचा कच्चा वास निघून जाईल.
नंतर त्यात कुळीथ घालून २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर चांगले परतावे. त्यानंतर चवीनुसार मसाला आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून परतावे.
एक कप पाणी घालून कुकरचे झाकण लावून कुळीथ शिजवून घ्यावेत. शिजल्यानंतर पाण्याचे प्रमाण आवडीनुसार ठेवावे आणि एक उकळी आणावी.
शेवटी कोथिंबीर घालून गरम गरम उसळ सर्व्ह करावी.