Dhanshri Shintre
सकाळचा नाश्ता काय करायचा, हा प्रश्न दररोज उठल्यावर अनेक गृहिणींना भेडसावत असतो.
तुम्ही नाश्त्याला साधा डोसा न बनवता इन्स्टेंट रवा-मैदा डोसा बनवू शकता जाणून घ्या सोपी रेसिपी.
रवा, मैदा, तांदूळ पीठ, चिरलेले कांदे, कोथिंबीर, मिरच्या, मीठ, तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता.
सर्वप्रथम रवा, मैदा, तांदळाचे पीठ, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या एकत्र करून त्याचे पातळसर पीठ भिजवावे.
हे पीठ १० मिनिटांसाठी झाकून ठेवावे. नंतर एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करावी व ती फोडणी पिठात नीट मिसळावी.
तवा गरम करून त्यावर आंबोळीप्रमाणे भांड्याच्या साहाय्याने कडेपासून मधोमध पीठ घालावे आणि त्याला आपोआप पसरू द्यावे.
डोसा एका बाजूने चांगला खरपूस झाला, की उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावा. भाजताना थोडे तेल सोडून डोसा कुरकुरीत करावा.
त्यानंतर मस्त गरमागरम डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.