Dhanshri Shintre
उडीद डाळ, तांदूळ, कोथिंबीर, शेपू किंवा मेथी, जिरे, मीठ, तेल.
शेपू किंवा मेथी चांगली स्वच्छ धुऊन बारीक चिरावी. आवडत असल्यास दोन्ही भाज्या घेऊ शकता.
४ तास भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ बारीक वाटून घ्यावी.
त्यात चिरलेला शेपू किंवा मेथी आणि मीठ, जिरे, कोथिंबीर घालावी.
सर्व मिश्रण एकत्र ढवळून, गरज वाटल्यास थोडे पाणी घालून डोशासाठी योग्य पीठ करावे.
तवा गरम करून, थोडे तेल लावून डोसे करावेत. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावेत.
शेपू-मेथी डोसा नारळाच्या चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.