Dhanshri Shintre
डोसा हा स्वादिष्ट दक्षिण भारतीय पदार्थ असून त्याची चव इतकी लाजवाब आहे की त्याचे प्रेमी संपूर्ण देशभरात सहज सापडतात.
डोसा आता फक्त दक्षिण भारतातच नाही, तर उत्तर भारतातही एक आवडता आणि लोकप्रिय नाश्ता ठरला आहे.
सांबार-चटणीसह डोसा अत्यंत स्वादिष्ट लागतो आणि तो साधा किंवा विविध स्टफिंगसह तयार केला जाऊ शकतो.
ज्वारी, उडीद डाळ, मेथी दाणे, मीठ, तूप.
एक कप ज्वारी, अर्धा कप उडीद डाळ व एक चमचा मेथी दाणे धुवून ७ तास भिजत ठेवा.
नंतर हे मिश्रण मऊसर आणि गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्या आणि ते आंबण्यासाठी काही वेळ बाजूला ठेवा.
पिठ आंबल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ मिसळा आणि नंतर डोसा पॅन गॅसवर चांगला गरम करा.
पॅनवर थोडं तूप लावून ग्रीस करा, मग पिठाचा एक चमचा घेऊन गोलाकार स्वरूपात सावकाश पसरवा.
आच कमी-मध्यम ठेवा, डोसा कुरकुरीत होईपर्यंत शिजवा आणि नंतर तो अर्धा फोल्ड करा.
कुरकुरीत ज्वारी डोसा गरम चटणी किंवा स्वादिष्ट सांबारसोबत सर्व्ह करा आणि चव वाढवा.