Eyebrow : आयब्रो केल्यानंतर स्किनवर छोटे लाल दाणे दिसतात? तर करा हे उपाय

Saam Tv

बारीक दाणे किंवा पुरळ

आयब्रो केल्यानंतर काही लोकांच्या स्किनवर बारीक दाणे किंवा पुरळ येते. काही वेळा त्या ठिकाणी सतत खाज येते आणि स्किन खराब होते. काही सोप्या टिप्समुळे यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

bumps after eyebrows | PINTREST

आयब्रो करताना स्किन टाईट ठेवा

आयब्रो करताना स्किन नेहमी टाईट ठेवा, नाहीतर यामुळे आयब्रोच्या आजूबाजूला कट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे त्वचेवर बारीक जखमा होऊ शकतात.

bumps after eyebrows

वॅक्सिंगचा वापर

स्त्रिया थ्रेडिंगपासून वाचण्यासाठी वॅक्सिंग करतात. चुकीचे वॅक्स निवडल्याने स्किनवर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

bumps after eyebrows

आईसिंग

आयब्रो केल्यानंतर त्वचा सेंसिटिव्ह होते. त्यामुळे त्वचा शांत होण्यासाठी त्यावर आयब्रो केल्यानंतर लगेचच आईसिंग करा. त्यामुळे छोटे दाणे, पुरळ येणार नाहीत.

bumps after eyebrows

अॅलोवेरा जेल

थ्रेडिंग झाल्यानंतर अॅलोवेरा जेल लावल्याने त्वचेला आराम मिळतो. त्यामुळे त्वचेची जळजळ थांबते.

bumps after eyebrows

हात आणि क्रिम लावणे टाळा

आयब्रो केल्यानंतर चेहऱ्याला किंवा त्या भागाला हात लावू नका. तसेच त्या भागावर कोणतेही केमिकलयुक्त क्रिम किंवा फेसवॉश, ब्लीच लावणे टाळा.

bumps after eyebrows

गुलाबजल

आयब्रो केल्यानंतर थंड गुलाबजल आयब्रोला लावा. त्यामुळे त्वचा शांत होते आणि आयब्रो निरोगी राहतात.

bumps after eyebrows

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

bumps after eyebrows

Health care Tips : दुसऱ्याला जांभई देताना पाहून आपल्याला का येते जांभई? कारण जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

YAWING TIPS | META AI
येथे क्लिक करा