Saam Tv
मानेवर कपड्यांची कॉलर,दागिने किंवा त्वचेचे घर्षण वारंवार होत असल्याने त्या भागात चामखीळ जास्त दिसतात.
जर तुम्हाला मानेवर जास्त घाम येत असेल तर घामामुळे ओलावा कायम राहतो. त्यामुळे त्याच भागात चामखीळ येण्याचे प्रमाण वाढते .
लठ्ठ झाल्याने मानेवर त्वचा वाढते. ती एकमेंकावर चोळली गेल्याने चामखीळ वाढण्यास मदत होते.
जर बरेच चामखीळ तुम्हाला मानेच्या आणि काखेच्या भागात दिसत असतील तर ही लक्षण मधुमेहाची देखील असू शकतात.
काही वयानंतर हार्मोनल बदल होतात. यामुळे देखील चामखीळ वाढू शकते किंवा प्रेग्नेंसी, PCOS ची समस्या देखील असू शकते.
आई वडिलांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना चामखीळ असतील तर तो अनुवंशिकरित्या मुलांना देखील येऊ शकतात.
जन्मत: असलेला चामखीळ घरी काढण्याचा प्रयत्न करू नये. दोरा बांधणे, केस गुंडाळणे, कापणे असे उपाय धोकादायक असतात. त्यामुळे संसर्ग किंवा रक्तस्त्राव होऊ शकतो.
रंग, आकारात बदल जाणवत असेल किंवा खाज आणि दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.