Korean Skin Care Tips : घरगुती उपायांनी मिळवा कोरियन ग्लास स्किन; जाणून घ्या सोपी स्किनकेअर रूटीन

Saam Tv

कोरियन स्किन

कोरियन लोकांची चमकणारा , फ्रेश चेहरा सर्वांनाच हवा असतो. पण काही केल्या तशी स्किन मिळतच नाही. काही घरगुती उपायांमुळे कोरियन स्किन तुम्ही सहज मिळवू शकता.

KOREAN SKIN CARE | PINTREST

चेहरा स्वच्छ धुवा

कोणताही मेक - अप करण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. व्यवस्थित कोरडा करा . चेहऱ्यावर मेक-अप असेल तर ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाचे तेल लावून मेक-अप व धूळ साफ करा.

KOREAN SKIN CARE | PINTREST

राईस वॉटर

तांदूळ काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा.नैसर्गिक टोनर म्हणून चेहऱ्याला लावा किंवा त्यावर येणाऱ्या सायीचा वापर देखील मास्क म्हणून करू शकता.

KOREAN SKIN CARE | PINTREST

कोरफड आणि मधाचा पॅक

कोरफडीच्या गरात गुलाबपाणी आणि मध मिसळून लेप तयार करा. हा लेप चेहऱ्याला लावल्याने स्किनला डीप मॉश्चराईजेशन मिळते.

KOREAN SKIN CARE | PINTREST

बर्फाचा वापर

थकलेल्या चेहऱ्याला थंड पाण्याचा शेक दिल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो. काही सेंकदासाठी बर्फाच्या पाण्याने मसाज केल्यास चेहऱ्यावर चमक येते.

KOREAN SKIN CARE | PINTREST

शीट मास्कचा वापर

आठवड्यातून किमान २ वेळा हायड्रेटिंग शीट मास्क वापरा. घरगुती उपाय म्हणून कापसाला राईस वॉटर किंवा ग्रीनटी मध्ये भिजवून ठेवा.

KOREAN SKIN CARE | PINTREST

तांदळाचे पीठ आणि दुधाचा स्क्रब

तांदूळाचे पीठ आणि कच्चे दूध एकत्र करून लेप लावून चेहऱ्यावर हलका मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

KOREAN SKIN CARE | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

KOREAN SKIN CARE | PINTREST

Health Alert : तुमच्याही चेहऱ्यावर पांढरे डाग असतील तर वेळीत सावध व्हा, असू शकतात या गंभीर आजाराची लक्षणे

skin disease Pityriasis Alba | Chatgpt
येथे क्लिक करा