Saam Tv
तुम्ही अनेकदा पाहिलंच असेल की, खूप लोक नद्यांमध्ये आणि विशेषत: गंगा नदीमध्ये नाणी टाकतात.
गंगा नदीत पाणी टाकणे ही एक हिंदू धर्मीयांची प्रथा आहे.
वास्तुशास्त्रानुसार, नाण्यांचे धातू (जसे की तांबे, पितळ) हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.
गंगेच्या पवित्र जलामध्ये हे नाणे टाकल्याने त्या ठिकाणी ऊर्जेचा सुसंवाद होतो.
गंगा नदीत नाणे टाकणे हा एक आशिर्वाद मिळवण्याचा मार्ग वास्तू शास्त्रात मानला जातो.
पाणी म्हणजे जीवन आणि गंगा म्हणजे पवित्रता. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.
पवित्र जलामध्ये तुम्ही नाणे अर्पण केल्याने आर्थिक वाढ होते. असं वास्तुशास्त्र सांगते.
तुम्ही जर एक नाणे गंगेला दिले म्हणजे तुमच्या धनात पैशात नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाढ होते.
त्यामुळे नाणे टाकल्याने घरात आर्थिक स्थिरता येते, अशी श्रद्धा आहे.
हे कृती अंधश्रद्धा म्हणून नाही, तर सकारात्मक मानसिकता, श्रद्धा आणि ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी केल्या जातात.