कोणी शिंकल्यावर God Bless You असं का म्हटलं जातं?

Surabhi Jayashree Jagdish

शिंका येणं

शिंका कोणालाही आणि कधीही येऊ शकते. तुम्ही पाहिलं असेल की, अनेकदा जेव्हा कुणाला शिंका येते तेव्हा समोरचा व्यक्ती त्याला “God Bless You” म्हणतो.

का म्हणतात?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शिंक आल्यावर “God Bless You” का म्हटले जाते?

कशी झाली सुरुवात?

रोममध्ये एका आजाराच्या काळात “God Bless You” म्हणण्याची सुरुवात झाली होती.

ब्यूबॉनिक प्लेग

या आजाराचं लक्षण म्हणजे खोकला आणि शिंका होती ज्याला ब्यूबॉनिक प्लेग असं नाव देण्यात आलं होतं.

पोप ग्रेगरी

जेव्हा एखादा व्यक्ती ब्यूबॉनिक प्लेगने ग्रस्त होत असे, तेव्हा पोप ग्रेगरी यांनी अशा व्यक्तीला शिंक आल्यावर “God Bless You” म्हणायला सुरुवात केली आणि लोकांनाही तसं सांगितले.

मृत्यूपासून रक्षण

यामागे असा विश्वास होता की “God Bless You” म्हटल्याने त्या व्यक्तीला मृत्यूपासून वाचवता येईल.

वाईट आत्मा

असंही मानलं जातं की, शिंकताना माणसाच्या शरीरातून वाईट आत्मा बाहेर पडतो.

दुसरी व्यक्ती

अशा वेळी जर कोणी “God Bless You” म्हटले, तर ती वाईट आत्मा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत नाही.

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी एकूण किती खोल्या आहेत?

येथे क्लिक करा