Surabhi Jayashree Jagdish
आग्र्याचा ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. याशिवाय तो सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
केवळ भारतातूनच नाही तर परदेशातूनही लोक इथे येतात. ताजमहाल मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता
शाहजहानने पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला.
ताजमहाल हे शाहजहान आणि मुमताज बेगम यांच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
पण तुम्हाला माहितीये का ताजमहालच्या आत किती खोल्या आहेत?
ताजमहालच्या आत एकूण 22 खोल्या आहेत. या 22 खोल्या ताजमहालमधील मुख्य मकबऱ्याच्या खाली आहेत.
जरी या खोल्या मुघल काळापासून बंद आहेत आणि या खोल्या शेवटच्या 1934 मध्ये उघडल्या गेल्या होत्या.