Bharat Jadhav
औरंगजेब आणि अकबर हे दोघेही मुघल साम्राज्याचे सम्राट होते. मुघल इतिहासात यांच्याविषयी सर्वाधिक लिहिले गेलंय.
अकबर आणि औरंगजेब यांच्याबाबत पाकिस्तानात वेगवेगळे विचार आहेत. पाकिस्तानी अकबरचा तिस्कार करतात. तर औरंगजेबवर प्रेम करतात.
अकबर यांच्या धार्मिक भूमिकेमुळे पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात द्वेषपूर्ण लेखाण करण्यात आलाय. पाकिस्तानी इतिहासकार मुबारक अली यांनी अनेक लेख लिहिले.
पाकिस्तानी इतिहासकार मुबारक अली लिहितात, हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र करण्याचा प्रयत्न केल्यामुळे अकबर यांच्यावर टीका झाली. त्यांनी मुस्लिमांना संकटात टाकले.
औरंगजेबाने मुस्लिम धर्माचा भाग म्हणून मद्यपान, जुगार आणि वेश्याव्यवसाय यांसारख्या प्रथांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले होते.
जे इस्लामिक कायद्यानुसार नव्हते ते सर्व कर औरंगजेबाने रद्द केले. महसुलाला पूरक म्हणून बिगर मुस्लिमांवर जिझिया कर लादण्यात आला.
औरंगजेब इस्लामचा कट्टर अनुयायी होता आणि त्याने मुस्लिमांच्या प्रगतीसाठी अनेक पावले उचलली.