Spotted Owl Facts: रात्री पिंगळा पक्षी का ओरडतो? काय असतात संकेत? जाणून घ्या सत्य

Sakshi Sunil Jadhav

धोक्याची घंटा

रात्रीच्या वेळी घराजवळ पिंगळा ओरडला की अनेकजण घाबरतात. काही ठिकाणी याला अपशकुन मानले जातं, तर काही जण याला भविष्यातले संकेत समजतात.

why owl hoots at night

पिंगळ्या पक्षाचे नाव

पिंगळा हा घुबड कुलातलाच एक लहान आकाराचा पक्षी असतो. त्याचं शास्त्रीय नाव Athene brama असे आहे. हा पक्षी भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांत आढळतो.

why owl hoots at night

अंधश्रद्धेचे कारण काय?

पिंगळ्याचा आवाज कर्कश आणि भीतीदायक असल्यामुळे पूर्वीपासून लोकांनी त्याला अशुभ मानतात. ‘पिंगळा ज्योतिष’ अशीही एक समजूत प्रचलित आहे, मात्र याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

owl superstition truth

निशाचर स्वभाव

पिंगळा हा निशाचर पक्षी आहे. तो दिवसा झाडांच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या छपरात किंवा सुरक्षित ठिकाणी विश्रांती घेतो आणि रात्री शिकार करतो.

owl superstition truth

आवाज का काढतो?

हा पक्षी शिकार शोधताना कर्कश आवाज काढतो. हा आवाज प्रतिध्वनीच्या मदतीने त्याला भक्ष्याचे स्थान ओळखण्यास मदत करतो.

owl signs and beliefs

मुख्य आहार काय?

उंदीर, घुशी, किडे, सरडे, बेडूक आणि लहान सरपटणारे प्राणी हे त्याचे मुख्य भक्ष्य आहे.

owl signs and beliefs

शेतकऱ्यांसाठी वरदान

उंदीर आणि घुशी पिकांचे व घरातील अन्नसाठ्याचे मोठे नुकसान करतात. पिंगळा त्यांची संख्या कमी करून अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना फायदा करून देतो.

owl signs and beliefs

वास्तव्य कुठे?

तुम्हाला हा पक्षी संपूर्ण भारतात पाहायला मिळेल. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार आणि श्रीलंका या ठिकाणी सुद्धा त्याचे वास्तव्य आहे.पण मानवी वस्तीजवळ राहणं त्याला आवडतं.

owl signs and beliefs

अशुभ नव्हे, शुभ संकेत

घराभोवती किंवा शेतात पिंगळा असणे म्हणजे उंदरांची संख्या कमी होणे. त्यामुळे तो अशुभ नसून पर्यावरणासाठी आणि शेतीसाठी उपयुक्त आहे.

owl signs and beliefs

निष्कर्ष

तज्ज्ञांच्या मते, ही अंधश्रद्धा आहे. प्रत्यक्षात पिंगळा हा निसर्गासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पक्षी आहे.

owl signs and beliefs

NEXT: Lizard Chirping: घरात बोलताना पाल चुकचुकली तर सगळं बोलणं होतं खरं? यामागचं कारण एकदा नक्कीच वाचा

lizard chirping omen meaning
येथे क्लिक करा