Manasvi Choudhary
हिंदू धर्मात मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात.
महिलांच्या सोळा श्रृंगारमध्ये मंगळसूत्राला पहिले महत्व आहे. म्हणून लग्नानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र असते.
मंगळसूत्रातील काळे मणी आणि सोने हे भगवान शंकर आणि पार्वती यांच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते.
मंगळसूत्र हे पती- पत्नीच्या नात्याचे प्रतीक मानले जाते. लग्नानंतर महिला गळ्यात पतीच्या नावाचे, संरक्षणाचे मंगळसूत्र घालतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, महिलांनी इतर दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र कधीही घालू नये. अनेकदा महिला कार्यक्रमानिमित्त दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घालतात मात्र असे करू नका.
नेहमी स्वत:चेच मंगळसूत्र घालावे. आपले मंगळसूत्र इतर कोणालाही देऊ नये हे अशुभ मानले जाते.
मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे. यामुळे दुसऱ्याला मंगळसूत्र दिल्याने वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.