Manasvi Choudhary
सर्व खेळाडूंनी कुटुंबासोबत, मित्र मैत्रिणीसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. याचदरम्यान भारतीय खेळाडू ईशान किशनला एका तरूणीने मिठी मारत अभिनंदन केले आहे. दरम्यान ही तरूणी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
माहितीनुसार, ईशान किशनला मिठी मारणाऱ्या तरूणाचे नाव अदिती हुंडिया आहे. मागील अनेक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत.
अदिती हुंडिया प्रसिद्ध मॉडेल आहे. मॉडेलिंगसह अदिती हुंडियाचा स्वत:चा क्लोथिंग फॅशन ब्रँड देखील आहे ज्याचे नाव 'लेबल अदिती हुंडिया' असं आहे.
अदिती हुंडियाचे वडिल ललित हुंडिया स्वत: बिझनेस मॅन आहेत. वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवत तिने हा व्यवसाय सुरू केला आहे.
सोशल मीडियावर अदिती कमालीची सक्रिय असते तिचे लाखे फॉलोवर्स आहेत.