Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उष्णतेमुळे ओठ कोरडे होतात व फाटतात यामुळे ओठांची काळजी घ्यावी लागते.
ओठांची त्वचा नाजूक असते यासाठी तुम्ही बाजारातील उत्पादनापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने ओठांची काळजी घ्या.
मध हा ओठांसाठी अत्यंत गुणकारी आहे. ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी ओठांवर मधाने मसाज करा आणि नंतर ओल्या कापडाने पुसून घ्या.
नैसर्गिकरित्या गुलाबी ओठांसाठी बीट आणि साय मिक्स करून लिपमास्क बनवा. बीटमुळे ओठ गुलाबी होतील.
आयुर्वेदात तूपाला विशेष महत्व आहे. साजूक तूपामध्ये तुम्ही हळद मिक्स करून ओठांना लावल्यास ओठ फाटणार नाही
ओठांना गुलाबासारखे कोमल बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या दुधामध्ये भिजत घालून त्याची पेस्ट ओठांना लावा यामुळे ओठांवरील काळपटपणा दूर होईल.
कोरफडचा गर नारळतेलात मिक्स करून ओठांना लावल्यास ओठांची जळजळ थांबते ओठ मऊ होतात