Saam Tv
सर्वात आधी तुम्ही गोड आहात म्हणुन तुम्हाला जास्त डास चावतात, हा समज एकदम चुकीचा आहे. पण खरच आजूबाजूला बसलेल्या लोकांपेक्षा तुम्हालाच डास जास्त का चावतात? याचा विचार केला आहे का?
प्रत्येकाच्या शरीरातून निघणारा कार्बन डायऑक्साईड, शरीराचा वास हा वेगळा असतो. यामुळे डास ठराविक लोकांकडे जास्त आकर्षित होतात.
श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. डासांना हा वायू दूरवरून जाणवतो. त्यामुळे व्यक्ती कुठे आहे याचा त्याला अंदाज येतो.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा नैसर्गिक वास हा वेगळा असतो. त्वचेवरील घाम,शरीरातील गरमी, तेल, त्यावर तयार होणारे सूक्ष्मजीव यांसारखे वास डासांना आकर्षित करतात.
डास फक्त वासाकडेच नाही तर कपड्यांच्या डार्क रंगांकडे देखील आकर्षित होतात. त्यामुळे डार्क रंगाचे कपडे घातलेल्यांना डास जास्त चावतात.
ज्या लोकांचे O रक्तगट असते. अशा लोकांना जास्त डास चावतात. असे सांगितले जाते. पण याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.