Health Tips : सतत थकवा, चक्कर येतेय? रक्त कमी झालंय? या 8 भाज्या नक्की खा, १ आवड्यात वाढेल रक्त

Saam Tv

रक्ताची पातळी वाढण्यात मदत

शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल की सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे अशी लक्षण दिसू लागतात. याचसाठी एक उपाय म्हणून या भाज्या खाल्यात तर रक्ताची पातळी वाढण्यात मदत होऊ शकते.

पालक

पालकमध्ये या हिरव्या पालेभाजीत आयर्न आणि फोलेट असते. पालकाची भाजी, सूप किंवा डाळीत पालक घालून तुम्ही आहारात पालकाचा समावेश करू शकता.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

शेवग्याची भाजी

शेवग्याच्या पानांमध्ये आयर्न, फोलेट आणि बरेच पोषक घटक असतात. शेवग्याची भाजी खाल्याने लवकरात लवकर रक्त वाढण्यास मदत होते.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

मेथीची भाजी

मेथीच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात. मेथीची साधी भाजी किंवा डाळीत मेथी घालूनही खाता येते. मेथीची भाजी खाल्याने रक्त तर वाढतेच याशिवाय केसांच्या वाढीसाठी मेथी गुणकारी असते.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

लाल माठ आणि हिरवा माठ

लाल माठ आणि हिरवा माठ या दोन्ही भाज्या आहारासाठी चांगल्या आहेत. माठाची भाजी खाल्याने त्वचेवर ग्लो येण्यासही मदत होते.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

चाकवत

चाकवत ही सुद्धा एक पौष्टिक पालेभाजी आहे. यात आयर्नसह भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. चाकवताची भाजी डाळीसोबत खाता येते.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

बीट

लाल बीटामुळे रक्ताची पातळी म्हणजेच हिमोग्लोबिन वाढण्यास प्रचंड मदत होते. बीटाची भाजी, बीटाचा रस, कच्चे बीट खाऊ शकता.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

ब्रोकोली

ब्रोकोलींमध्ये फोलेट, व्हिटॅमिन C आणि इतर पोषक घटक असतात. व्हिटॅमिन C मुळे शरीराला पदार्थांतून आर्यन शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे या इतर भाज्यांबरोबरच ब्रोकोलीचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

हिरवे वाटाणे

हिरव्या वाटाण्यांमध्ये आयर्न आणि फोलेटसह प्रोटिन आणि फायबरही असते. यातील पोषक घटकांमुळे हृदय निरोगी राहते.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

भाज्यांसोबत लिंबू नक्की खा

फक्त या भाज्या खाणे पुरेसे नाही तर हे आयर्न पदार्थांतून शोषून घेण्यासाठी लिंबाचे किंवा व्हिटॅमिन C युक्त फळांचे सेवनही महत्त्वाचे आहे.

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

टीप

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत

LOW BLOOD / IRON DEFICIENCY | PINTREST

Health Tips : जेवणासोबत कच्चा कांदा आणि लसूण खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

Benefits of onion and garlic | meta ai
येथे क्लिक करा