Saam Tv
कांद्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B6, फोलेट, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट आढळतात. क्वेरसेटिनसारखे कंपाऊंड आणि सल्फर देखील कांद्यामध्ये असते. ज्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट मिळतात.
कांद्यामध्ये असलेले सल्फर इन्सुलिनची पातळी सुधारते. ग्लुकोज कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डायबिटीझ असणाऱ्या लोकांनी कच्चा कांदा खाणे उत्तम.
कांद्यांमध्ये प्रिबायोटिक फायबर असते. ज्यामुळे अन्न सहज आणि लवकर पचण्यास मदत होते.
कच्च्या लसूणात एलिसिन, सल्फर, व्हिटॅमिन C , व्हिटॅमिन B6 , मँगनीज आणि अँटीऑक्सिडंट असतात.
लसणात असणारे एलिसिन, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते. एलिसिनमुळे रक्तवाहिन्या रूंद होतात, आणि रक्ताभिसरण चांगले होते.
कच्च्या लसणात असलेले एलिसिन आणि सल्फर इम्यूनिटी बूस्ट करण्यात मदत करतात. त्वचेच्या अॅलर्जीपासून संरक्षण करतात.
लसणात असलेले बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड्स कोलेस्ट्रॉल आणि हृदयासंबधित आजारापासून संरक्षण करतात. हृदयाला तंदुरूस्त ठेवण्यास मदत करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.