Saam Tv
या वयात बाळांची झोप सामान्य माणसांपेक्षा वेगळी असते. नवजात बालकांना दिवसातून साधारण १४ ते १७ तास झोप आवश्यक असते.
या वयात साधारण १२ ते १६ तास मुलांना झोप आवश्यक असते. बाळाच्या आरोग्यासाठी ही झोप महत्त्वाची असते.
या वयातील मुलांना १४ तासाची झोप ही पुरेशी असते. वाढत्या वयात ही झोप घेणे महत्त्वाचे असते.
या वयात मुले खेळ, मस्ती, अभ्यास यामध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे १० ते १३ तास झोप घेणे गरजेचे असते.
या वयात मुले शाळेत गुंतलेली असतात. अभ्यास, खेळ, शाळेतले प्रोजेक्ट्स यामुळे मुलांचा दिवस व्यस्त असतो. त्यामुळे शरीराला आणि मेंदूला आराम मिळण्यासाठी ९ ते १२ झोप पुरेशी असते.
याच वयात मुलांना अनेक व्यसन लागण्याची शक्यता असते. जस की मोबाईलचे व्यसन. या व्यसनामुळेच मुले झोपत नाहीत आणि मुलांच्या आरोग्यावर आणि मनावर अनेक परिणाम होत असते. अशा वयातील मुलांना ८ ते १० तास झोप गरजेची असते.
कामाचा ताण, मोबाईलचा वापर आणि अनेक सवयींमुळे झोप कमी होते. मात्र चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ८ तास झोप ही महत्त्वाची असते.
या वयात शरीरात अनेक बदल होत असतात. शरीर थकलेले असते. झोप नीट लागत नाही. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडलेले असते. या वयात साधारण ८ ते ९ तास झोप पुरेशी असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.