Manasvi Choudhary
व्यक्ती लहान असो किंवा मोठा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती ही वाटत असते.
भीती नेमकी का वाटते यामागचं कारण संशोधनातून मिळालं आहे.
भीतीचे कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी उंदीर या प्राण्यावर संशोधन केले आहे.
उंदीर हा प्राणी अत्यंत भित्रा आहे. उंदरांना मोठा आवाज, भांडी पडण्याचा आवाज, विजेचा झटका याची भिती वाटते.
यामुळे उंदरावर संशोधन करून भिती का वाटते यामागचं कारण मिळालं आहे.
भीतीमुळे मेंदूमध्ये बदल होतात, असे संशोधनातून दिसून आले आहे
मेंदूमध्ये हिप्पोकॅम्पस आणि अमिग्डाला हे दोन सर्किट असतात जे धोकादायक काय आणि सुरक्षित काय हे लक्षात ठेवते.
अमिगडालामध्ये भिती निर्माण होते. तर हिप्पोकॅम्पस भीतीला प्रतिसाद देते. भीतीच्या वेळी शरीरात विशेष हार्मोन्स आणि रासायनिक घटकांचा स्त्रावही होतो.