Manasvi Choudhary
पूर्वी पत्रव्यवहाराने लोक आपल्या भावना व्यक्त करायचे.
आताच्या डिजीटलायझेशनच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणे सोपे झाले आहे.
मॅसेजिंग अॅप आल्यानंतर अनेकजण आता फोनवर कमी आणि मॅसेजवर जास्त बोलू लागले आहेत.
मॅसेजवर चॅटिंग करताना सर्वाधिक वापरले जाणारे म्हणजे इमोजी.
मॅसेजवर आपल्या भावना समोरील व्यक्तीला सांगण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो.
सध्या इमोजीचा ट्रेंड खूप वाढला आहे. भावना व्यक्त करण्यासाठी, संदेश आणि सोप्या भाषेसाठी इमोजी वापरला जात आहे.
गेल्या वर्षभरात सर्वाधिक वापरला गेलेला इमोजी म्हणजे आनंदाश्रू असलेला चेहरा.
या इमोजीमध्ये डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू दिसत आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती जास्त आनंदी असते तेव्हा हा इमोजी वापरला जातो.