Hotel Rooms: हॉटेलच्या रूममध्ये खुर्ची का असते? हे 1 कारण वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Manasvi Choudhary

हॉटेल रूम

जेव्हा तुम्ही बाहेरगावी फिरायला जाता तेव्हा हॉटेल बुक करतात. हॉटेल म्हटलं की नजरेसमोर येतं ते म्हणजे अलिशान बेड, सुंदर पडदे आणि टीव्हीसोबतच एक किंवा दोन खुर्च्या पाहायला मिळतात.

Hotel Rooms

हॉटेलच्या खोलीमध्ये खुर्ची का असते?

मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, हॉटेलच्या खोलीत विश्रांतीसाठी बेड असताना खुर्ची का असते? हॉटेलच्या खोलीमध्ये खुर्ची असण्यामागचे नेमके कारण काय? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Hotel Rooms

सामान ठेवण्यासाठी सोयीची जागा

अनेक प्रवासी हॉटेलमध्ये पोहोचल्याक्षणी आपले कपडे किंवा बॅग लगेच कपाटात लावत नाहीत. अशा वेळी बॅग किंवा सामान बेडवर विस्कटून ठेवण्यापेक्षा जवळ असलेल्या खुर्चीवर ठेवणे प्रवाशांसाठी अतिशय सोयीचे पडते.

Luggage Placement

रूम साफ करताना हॉटेल कर्मचाऱ्यासाठी सोईस्कर

हॉटेलमधील हाऊसकीपिंग स्टाफला कमी वेळेत अनेक खोल्या स्वच्छ कराव्या लागतात. खोलीची स्वच्छता करताना बेडशीट बदलणे किंवा इतर कामे चालू असताना सामान इकडे-तिकडे हलवण्यासाठी किंवा बाजूला ठेवण्यासाठी ही खुर्ची अतिशय उपयोगी ठरते.

Luggage Placement

जॅकेट, हँडबॅग आणि वैयक्तिक वस्तू ठेवण्यासाठी

आपण बाहेरून आल्यावर आपले जॅकेट, ओव्हरकोट, हँडबॅग किंवा टोपी कुठे ठेवावी, असा प्रश्न पडतो. अशा वेळी रूम कितीही नीटनेटकी ठेवली तरी वस्तू टाकण्यासाठी खुर्चीचा वापर केला जातो, ज्यामुळे खोली पसारा झाल्यासारखी दिसत नाही.

Luggage Placement

हलवायला सोपे आणि मल्टीपर्पज फर्निचर

हॉटेलच्या इतर मोठ्या फर्निचरच्या तुलनेत खुर्ची वजनाने हलकी आणि कुठेही सहज हलवता येते. जर एखाद्या पाहुण्याला खिडकीजवळ बसून चहा-कॉफीचा आनंद घ्यायचा असेल, लॅपटॉपवर काम करायचे असेल किंवा डेस्कवर काही कागदपत्रे तपासायची असतील, तर खुर्चीचा ह हवा तसा वापर करता येतो.

Hotel Room Chair

हॉटेलच्या सौंदर्यात आणि फोटशूटमध्ये भर

आजकाल ऑनलाइन बुकिंगसाठी हॉटेल्सचा लुक अतिशय महत्त्वाचा मानला जातो. स्टायलिश डिझाइनच्या खुर्च्या रूमची शोभा वाढवतात. तसेच अनेक जण हॉटेल रूममध्ये तयार होताना किंवा फोटो काढताना या खुर्चीचा वापर बॅकग्राउंड प्रॉप म्हणून करतात.

Hotel Room Chair

NEXT: Banana Benefits: केळी खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या

Banana Benefits
येथे क्लिक करा...