Dog behavior: विशिष्ट लोकांवरच कुत्रे अचानक जास्त का भुंकतात?

Surabhi Jayashree Jagdish

इमानदार प्राणी

माणसाचा सर्वात इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा मानला जातो. तो केवळ घराची राखण करत नाही तर कुटुंबाचा खरा साथीदार म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे कुत्र्याला निष्ठेचं प्रतीक मानण्यात येतं.

वास घेण्याची क्षमता

कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अत्यंत तीव्र असते. याच कारणामुळे त्यांचा वापर पोलिस आणि सैन्यात केला जातो. ही क्षमता त्यांना विशेष बनवते.

कु्त्र्याचं भुंकणं

कुत्रा कधी कधी गर्दीत किंवा रस्त्यावर चालणाऱ्या सर्वांवर नाही तर फक्त काही लोकांवरच भुंकतो? त्याचं हे वागणं अनेकांना आश्चर्यचकित करतं. पण यामागे काही कारणं असतात.

भीतीचा वास

कुत्र्यांची वास ओळखण्याची क्षमता माणसांपेक्षा हजारो पट चांगली असते. जर एखादा व्यक्ती घाबरलेला असेल तर कुत्रा त्याच्या भीतीचा वास ओळखतो. त्यामुळे तो त्या व्यक्तीवर प्रतिक्रिया देतो.

बॉडी लँग्वेज

कुत्रा माणसांची बॉडी लँग्वेज खूप बारकाईने समजतात. थेट डोळ्यांत पाहणं, वेगाने चालणं किंवा अचानक हालचाल करणं यामुळे त्यांना धोका वाटतो. त्यामुळे ते भुंकून इशारा देतात.

जुन्या गोष्टी

कुत्रा कधीही आपले जुने अनुभव विसरत नाही. जर त्यांना पूर्वी एखाद्या व्यक्तीने मारलं किंवा घाबरवलं असेल तर ते लक्षात ठेवतात. त्यामुळे ते पुन्हा त्या व्यक्तीवर भुंकतात.

परिसराचं लक्षण

कुत्रे आपल्या परिसराचं रक्षण करतात. जर त्यांना वाटलं की, एखादी व्यक्ती आपल्यासाठी धोका आहे तर ते भुंकतात.

Satara Tourism: गारेगार वातावरणात पिकनीकला जाताय? साताऱ्यातील ही ठिकाणं ठरतील बेस्ट ऑप्शन

येथे क्लिक करा