Ankush Dhavre
तुम्ही गाडी चालवत असता आणि अचानक कुत्रे तुमच्या गाडीच्या मागे धावू लागतात, हे तुम्ही बऱ्याचदा अनुभवलं असेल.
कुत्रे असं का करत असतील? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना?
तज्ञांच्या माहितीनुसार, कुत्रे गाडीचं फिरतं चाक पाहून गाडीच्या मागे धावतात.
माहितीनुसार, गाडीच्या चाकातून येणाऱ्या दुसऱ्या कुत्र्यांच्या वासामुळेही कुत्रे आक्रमक होतात.
कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता ही खूप चांगली असते.
कुत्रे गाडीच्या चाकावर लघवी करतात.
ज्यावेळी तुम्ही गाडी घेऊन जात असता, त्यावेळी कुत्र्यांना त्याचा वास येतो.
आपल्या परिसरात दुसरा कुत्रा आला आहे, असं त्यांना वाटू लागतं. त्यामुळेच ते गाडीच्या मागे धावतात .
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही.