अचानक रात्रीच्या वेळेस का ओरडू लागतात कावळे?

Surabhi Jayashree Jagdish

कावळा

साधारणपणे कावळे दिवसा अधिक आपल्याला आकाशात दिसतात. पण काही वेळा रात्री अचानक त्यांचा कर्कश ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. अनेकांना यामागे काही संकेत किंवा अपशकुन असल्यासारखं वाटतं.

नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणं

मात्र बहुतांश वेळा यामागे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणं असतात. कावळे हे अतिशय सतर्क आणि बुद्धिमान पक्षी आहे. जाणून घेऊया कावळे रात्रीच्या वेळेस का ओरडतात.

धोका

रात्री एखादा प्राणी, माणूस किंवा अनोळखी हालचाल दिसली तर कावळे सतर्क होतात. इतर कावळ्यांना सावध करण्यासाठी ते जोरात ओरडतात.

शत्रू दिसल्यास

घुबड हे कावळ्यांचे प्रमुख शत्रू मानले जातात. रात्री घुबड फिरत असल्यामुळे कावळे गोंधळ घालतात.

प्रकाश आणि आवाज

रस्त्यावरील लाईट्स, वाहनांचे हॉर्न किंवा मोठे आवाज झाल्यास कावळ्यांची झोप मोड होते. अचानक जाग आल्याने ते अस्वस्थ होतात. त्यातून ओरडण्याचा आवाज येतो.

हवामान बदलाची चाहूल लागल्यास

पावसाआधी, वाऱ्याचा वेग वाढल्यास किंवा दाब बदलल्यास कावळे अस्वस्थ होतात. अशा वेळी त्यांचं ओरडणं वाढतं. हे हवामानातील बदलाचं संकेत असू शकतं.

पिल्लं किंवा घरट्याच्या संरक्षणासाठी

घरट्याजवळ हालचाल जाणवली तर कावळे ओरडू लागतात. पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी ते अधिक आक्रमक होतात. अशावेळी रात्रीच्या वेळेसही ते ओरडतात.

लोकांमध्ये असलेला समज

काही लोक रात्री कावळ्यांच्या ओरडण्याला अपशकुन मानतात. पण यामागे कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

कोणत्या भाजीमध्ये खोबरं वापरू नये? भाजीची चव बिघडेल

येथे क्लिक करा