Sakshi Sunil Jadhav
काही वेळेस काही माणसांसमोर अथवा एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर रिलेशनशिपमध्ये भांडणं होतात.
रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकांना समजून घेणे अपेक्षित असते.
बऱ्याच वेळेस असे न झाल्यास नात्यात भांडणं होऊ शकतात.
पुढे तुम्हाला याची मूळ कारणं दिली आहेत जी तुम्ही समजून घेऊन तुमचे नाते टिकवू शकता.
पार्टनरसोबत मोजकं बोलण्याने गैरसमज वाढतात. तसेच रिलेशनशिप संपू शकते.
पार्टनर तुमच्यावर सतत संशय घेत असेल तर नात्यात खूप भांडणं होतात आणि ते नातंच संपतं.
तुम्ही पार्टनरसोबत तुमचा क्वालिटी टाईम घालवत नसाल तर त्याने चिडचिड होते आणि भांडण होतं.
पार्टनरच्या गोष्टी न ऐकणे सतत कामात व्यस्त राहणे याने चिडचिड वाढते.