Shraddha Thik
लाज वाटू लागताच आपला चेहरा टोमॅटोसारखा लाल होतो. पण असे का होते?
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आनंदी असतो तेव्हा आपले गाल आपोआप लाल होतात, ज्याला ब्लश म्हणतात.
पण जेव्हा आपण हसतो किंवा स्माईल करतो तेव्हा आपले गाल लाल होत नाहीत. असे का?
ब्लशिंग ही एक स्वयंचलित प्रक्रिया आहे ज्यामध्ये जेव्हा आपण लाजतो किंवा आपण आतून आनंदी असतो आणि व्यक्त करू शकत नाही. तेव्हा आपले गाल लाल होतात.
कोणतीही व्यक्ती विनाकारण लाजत नाही, ब्लश येण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
आपण एखाद्या गोष्टीबद्दल खूप आनंदी आहात, तेव्हा आपल्या मेंदूला एक सिग्नल मिळतो. याद्वारे आपली त्वचा सांगू इच्छिते की आपल्याला काहीतरी जाणवत आहे जे आपण सांगू शकत नाही.
हा आपला मेंदूने त्वचेला दिलेला सिग्नल असतो. जेव्हा आपण ब्लश करतो तेव्हा मेंदूमध्ये एड्रेनालाईनची रश होते ज्यामुळे गालाभोवती रक्त प्रवाह वाढतो. या प्रक्रियेला व्हॅसोडिलेशन म्हणतात ज्यामध्ये रक्त त्वचेत वेगाने जाते ज्यामुळे चेहऱ्याचा काही भाग लाल दिसू लागतो.