Shraddha Thik
फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात त्यामुळं फळं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.
पेरू हे देखील पौष्टिक फळ आहे. पेरू पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर आणि प्रथिने यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
पेरूचा वापर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.
पेरू योग्य पद्धतीनं खाल्ल्यास पोट दुखत नाही उलट बरे होते. तसंच पोषक तसंच फायबरयुक्त पेरू खाल्ल्यानं आपली पचनसंस्थाही व्यवस्थित चालते.
अनेकदा पेरू खाल्ल्यानंतर काहींच्या पोटात दुखते आणि याचे कारण पेरूच्या बिया असतात. असा त्रास होणाऱ्यांनी पेरू खाण्यापूर्वी बिया काढून वेगळ्या कराव्यात.
फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या पेरूचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. यासोबतच पचनक्रियाही निरोगी राहते. यामुळेच अनेक डॉक्टर बद्धकोष्ठता असेल तेव्हा पेरू खाण्याचा सल्ला देतात.
पेरू खाल्ल्यानं गॅस आणि पित्ताचा त्रास कमी होतो. कारण पेरू हे देखील आम्लयुक्त प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे पेरू खाल्ल्याने वात निघणे सोपे होते आणि वात संतुलित राहतो.
रिकाम्या पोटी पेरू खाणं मूळव्याधीच्या बाबतीत खूप फायदेशीर आहे. खरे तर मुळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बद्धकोष्ठता. जी पेरू खाल्ल्याने कमी होते आणि अशा प्रकारे पेरू खाल्ल्याने मूळव्याधांमध्येही फायदा होतो.