हाडांमधून कट-कट आवाज का येतो? यावर काय उपाय केले पाहिजेत?

Surabhi Jayashree Jagdish

हाडांमधून कटकट आवाज येणं

हाडांमधून कटकट आवाज येणं सामान्य असू शकतं. पण जर रोज होत असेल आणि त्यासोबत वेदना असेल तर दुर्लक्ष करू नये. हे गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

कमी लुब्रिकेशन

सांध्यांमध्ये लुब्रिकेशन कमी झाल्यास आवाज येतो. वय वाढल्यावर कार्टिलेज घासल्यामुळेही ही समस्या होते. यामुळे सांध्यांची हालचाल कठीण होते.

बराच वेळ एका स्थितीत बसणं

बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यानेही आवाज येऊ शकतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची कमतरता ही मोठी कारणं आहेत. यामुळे हाडं कमकुवत होतात.

व्यायाम आणि स्ट्रेचिंग

रोज हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं. यामुळे सांध्यांची हालचाल सुधारते. कटकट आवाज कमी होण्यास मदत होते.

हा उपाय करा

सकाळी उठताना जास्त त्रास जाणवत असल्यास हा उपाय करा. यामध्ये रात्री मोहरी किंवा नारळाच्या तेलाने हलकी मालिश करा. यामुळे सांध्यांना आराम मिळतो.

हायड्रेशन

हाडं मजबूत करण्यासाठी आहारात दूध, दही, तीळ, रागी आणि बदाम घ्या. पुरेसं पाणी पिणंही आवश्यक आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

व्हिटॅमिन D

रोज १५–२० मिनिटं उन्हात बसल्याने व्हिटॅमिन D मिळते. यामुळे सांध्यांमध्ये कटकट येणारा आवाज कमी होतो. जर वेदना, सूज किंवा चालण्यात अडचण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा