Dhanshri Shintre
पावसाळा सुरू झाल्यानंतर घरात किंवा आजूबाजूला मुंग्या अचानक वाढताना दिसून येते.
मुंग्या अनेकदा एकाच ओळीत चालताना तुम्हाला दिसतात, ज्यामुळे त्यांच्या संघटित हालचालीचं दर्शन होतं.
तुम्हाला कधी आश्चर्य वाटलं आहे का, मुंग्या का एकाच रांगेत चालतात आणि त्यामागे काय कारण आहे?
मुंग्या चालताना फेरोमोन नावाची रसायने सोडतात, ज्यामुळे त्या एकमेकांच्या मार्गदर्शनासाठी रेषा तयार करतात.
इतर मुंग्या त्या फेरोमोनच्या वासाचा मागोवा घेत एकत्र येऊन एक ठराविक रेषेत चालतात.
फेरोमोन मुंग्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करतात आणि त्यांना आपला ठिकाण शोधण्यात मदत करतात.
फेरोमोनचा वापर मुंग्यांना चुकीच्या मार्गाने जाण्यापासून आणि हरवण्यापासून वाचवतो.