Dhanshri Shintre
तुम्हीही कधी ना कधी काचेच्या ग्लासमधून पाणी प्यायलं असेलच, पण त्यामागचं विज्ञान माहिती आहे का?
आजही काही ठिकाणी चहा फक्त काचेच्या ग्लासमध्येच दिला जातो.
काचेचा वापर करताना एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल, जी इतर भांड्यांपेक्षा वेगळी आहे.
काचेच्या ग्लासवर काही वेळा पांढऱ्या रंगाचे डाग उमटलेले तुम्ही नक्कीच पाहिले असतील.
काचेच्या काचांवर उमटणाऱ्या पांढऱ्या डागांचे कारण तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? चला जाणून घेऊ.
काचेवर दिसणारे पांढरे डाग हे खरेतर पाण्यातील खनिजे साचल्यामुळे तयार होतात, विशेषतः कडक पाण्यामुळे होतात.
पाण्यातील कॅल्शियम व मॅग्नेशियम खनिजांमुळे काचांवर पांढरे डाग तयार होतात, हे सामान्य कडक पाण्याचे परिणाम आहेत.
कडक पाण्यातील चुना काचेला चिकटतो आणि त्याचा थर बसल्यामुळे काचांवर पांढरे डाग तयार होतात.