Manasvi Choudhary
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा आहे. दिवाळी पाडवा या सणाला बालिप्रतिपदा असे देखील म्हणतात.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक म्हणजे दिवाळी पाडवा आहे. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो.
दिवाळी पाडवा हा दिवस खास पती- पत्नीच्या नात्याचा गोडवा म्हणून साजरा केला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
दिवाळी पाडव्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवाशी स्त्रिया पतीव्रत करतात पतीची ओवाळणी करतात.
दिवाळी पाडवा हा शुभ मुहूर्त सकाळी १०.५६ पासून ते दुपारी १२.२३ पर्यत आहे. तसेच संध्याकाली ४.२४ पासून ते ६.०९ पर्यंत आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.