Manasvi Choudhary
अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. दिवाळीचा सण हा प्रकाशाचा , विजयाचा उत्साह मानला जातो.
दिवाळीनिमित्त तिने मनमोहक फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो खुपच सुंदर दिसत आहेत.
दिवाळीनिमित्त पूजाने लाल रंगाची इलकल साडी परिधान केली आहे. या साडीवर मॅचिंग तिने ब्लाऊज घातला आहे.
कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळी टिकली असा पूजाचा मराठमोळा साजश्रृगांर आहे.
पूजाने चाहत्यांना 'शुभ दिपावली' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पूजा नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. वेस्टर्न असो या ट्रेडिशनल पूजा प्रत्येक लूकमध्ये भारी दिसते.
वेगवेगळ्या पोजमध्ये पूजाने हे खास फोटोशूट क्लिक केलं आहे. ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.