ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रस्त्यावरुन चालताना तुम्ही रस्त्याच्या कडेला बसवलेले माइलस्टोन पाहिले असतील ज्यावर जागा आणि त्याचे अंतर लिहिलेले असते.
या दगडांचा वरचा भाग पिवळा, हिरवा, काळा आणि केशरी रंगाचा असतो. तर प्रत्येक दगडाचा खालचा भाग पांढरा रंगाचा असतो.
माइलस्टोन म्हणजेच मैलाच्या दगडाच्या वेगवेगळ्या रंगाच्या मागे एक खास कारण आहे.
राष्ट्रीय महामार्ग किंवा नॅशनल हायवेवर बसवण्यात आलेल्या माइलस्टोनचा वरचा रंग पिवळा असतो.
राज्य महामार्गावरील बसवण्यात आलेल्या माइलस्टोनचा वरचा रंग हिरवा असतो.
जर रस्त्यावर तुम्हाला काळ्या, निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा माइलस्टोन दिसला तर समजा तुम्ही मोठ्या शहरात किंवा जिल्ह्यात पोहोचला आहे.
रस्त्याच्या कडेला जर तु्म्हाला केशरी रंगाचा माइलस्टोन दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही गावाच्या रस्त्यावर आहात.
रस्त्याच्या कडेला बसवलेल्या माइलस्टोनचा रंग ( colour) कोड समजून घेतल्यावर त्या ठिकाणाची माहिती गोळा करणे सोपे जाते.