ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेवणाला स्पेशल काय बनवायचे असा प्रश्न पडलाय, तर ही काजू करी रेसीपी एकदा नक्की ट्राय करा.
जर घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये ही स्पेशल काजू करी डिश बनवू शकता.
सर्वात आधी कांदा ,टमाटर आणि मिरची कापून घ्या.
एका पॅनमध्ये थोडे तूप अॅड करुन काजू लाइट गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या.
एका पॅनमध्ये थोडे तेल अॅड करुन यात कांदा आणि काजू मिक्स करा. त्यानंतर यात पाणी अॅड करुन उकळवून घ्या.
उकळलेल्या मिश्रणाला एका भांड्यात काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि पेस्ट तयार करुन घ्या.
एका कढईमध्ये जीरा, तेजपत्ता कांदा आणि मीठ अॅड करुन गोल्डन होईपर्यंत भाजा. या मसाल्यात तयार केलेला पेस्ट अॅड करा. यात दही आणि मलाई अॅड करुन चांगले मिक्स करा.
या ग्रेवीमध्ये तुपात भाजून घेतलेले काजू अॅड करा. आणि ग्रेवी चांगली शिजवून घ्या. यानंतर यात कोथिंबिर अॅड करुन काजू करी डिश सर्व्ह करा.
NEXT: जगातील सर्वात महाग झाड, किंमत ऐकून आश्चर्यचकित व्हाल!