Surabhi Jayashree Jagdish
महाभारतात पांडवांना १२ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि या काळात त्यांनी वनात यज्ञ केला.
पांडवांच्या यज्ञावर परिणाम करण्याच्या उद्देशाने, दुर्योधनही तिथे गेला आणि त्याने आपल्या युक्त्यांनी यज्ञात अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली.
यामुळे पांडव नाराज झाले आणि अर्जुनाने यज्ञाचं निरीक्षण करण्यासाठी इंद्रदेवाला प्रार्थना केली. त्यानंतर इंद्रदेवाच्या देखरेखीखाली यज्ञ सुरू झाला.
जेव्हा दुर्योधनाने पुन्हा यज्ञामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्रदेवाच्या काही गंधर्वांनी दुर्योधनाला दोरीने बांधले आणि त्याला स्वर्गात नेले.
जेव्हा अर्जुनला हे कळलं तेव्हा तो दुर्योधनाला वाचवण्यासाठी स्वर्गात पोहोचला आणि म्हणाला की दुर्योधन यज्ञात आमचा पाहुणा आहे आणि त्याचे प्राण वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे.
गंधर्वांनी अर्जुनाच्या विनंतीवरून दुर्योधनाला सोडले. यानंतर, दुर्योधनाचे प्राण वाचवण्यासाठी, अर्जुनाने दुर्योधनाकडून ३ बाणांचे वरदान मागितले.
दुर्योधनाने अर्जुनाला हे वरदान दिलं आणि म्हटलं की हे ३ बाण सामान्य नाहीत तर तीन महान योद्ध्यांसाठी आहेत.
महाभारत युद्धात अर्जुनाने या बाणांचा वापर केला आणि हे धर्मयुद्ध जिंकले.