Dhanshri Shintre
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलावर तुमच्या प्रचलित असेलचं.
पण तुम्हाला काही वर्षांपुर्वी शोध लागलेल्या जगदंबा तलवारीबद्दल माहितीये का? ही तलवार लंडनला कशी पोहोचली? चला जाणून घेवूयात.
1857 मध्ये चौथ्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अल्पवयाचा फायदा घेत ही तलवार प्रिन्स ऑफ वेल्सला भेट म्हणून देण्यात आली.
या भेट दिलेल्या तलवारीची Catalogue Of The Collection Of Indian Arms And Object Of ART मध्ये नोंद करण्यात आली आहे.
म्हणजे स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की, सदर तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे.
जगदंबा तलवार लंडनमधील Marlborough House मधल्या इंडिया हॉलमधील case Of ARMS मध्ये ठेवण्यात आली आहे.
अंतुले यांच्या काळात भारतात ही तलवार आणण्यासाठी प्रयत्न केले गले, परंतु ते अपयशी ठरले.