Dhanshri Shintre
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन शाही तलवारींबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
ऐतिहासिक नोंदींनुसार, महाराजांकडे तीन विशेष तलवारी होत्या.
औपचारिक तलावारींना अनेकदा कौटुंबिक देवतांचे नाव दिले जायचे. शिवाजी महाराजांची कुलदैवत तुळजा भवानी होती.
म्हणून त्यांनी त्यांच्या दोन तलवारींची नावं तुळजा आणि भवानी अशी ठेवली. मात्र या तलवारी सध्या कुठे आहेत?
शिवरायांची तुळजा तलवार सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यात श्री शिवराजेश्वर या शिवरायांच्या मंदिरात आहे. शहाजीराजेंनी 1662 साली शिवरायांनी दिली होती.
तर भवानी तलवार साताऱ्याच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर महालामध्ये आहे.
तिसऱ्या तलवारीचं नाव होतं जगदंबा. सध्या ब्रिटनमधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे.
ही तलवार भारतात परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण यश मिळाले नाही.