Manasvi Choudhary
शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज फडकवून स्वराज्याची स्थापना केली.
मात्र शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज का निवडला? हा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा ध्वज निवडण्यामागील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक कारण आहे.
हिंदू धर्मात भगव्या रंगाला विशेष महत्व आहे.
हिंदवी स्वराज्य आणि धार्मिक संस्कृतीच्या रक्षणाची भावना दर्शवण्यासाठी या ध्वजाचा वापर केला.
शिवाजी महाराजांच्या लढाया आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेत भगवा ध्वज स्वातंत्र्य आणि शौर्याचे प्रतीक मानला जाई.