ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शास्त्रांनुसार, असे मानले जाते की, जेव्हा एखादी मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात येते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती आत्मा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते.
याचा अर्थ, आत्मा भटकत आहे. त्यांना दुसरा जन्म किंवा मोक्ष मिळू शकत नाही. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही दानधर्म, धार्मिक प्रवचनचे आयोजन करा.
देवाचे नाव घ्या, दान करा आणि ती विधी मृत व्यक्तीला समर्पित करा.
पक्ष्यांना धान्य आणि पाणी आणि गायींना भाकरी खायला द्या. कुत्र्यांना भाकरी खायला दिल्याने मृत आत्म्यालाही शांती मिळते.
रोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. तसेच तुम्ही भगवत गीता कथेचे देखील आयोजित करू शकता.
अमावस्येच्या दिवशी, पितृपक्षात तुमच्या पूर्वजांची विशेष पूजा करा.
गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीसाठी दान, सत्कर्म, गीता पठण आणि पिंडदान करावे, ही कामे सुमारे ३ वर्षे करावीत.