ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नानंतर जेव्हा पती-पत्नीमधील संबंध चांगले नसतात तेव्हा लोक घटस्फोट घेतात. जगातील विविध देशांमध्ये घटस्फोटाबाबत विशेष कायदे आहेत.
जवळजवळ प्रत्येक देशात घटस्फोटासाठी कायदा आहे. पण जगात असा एक देश आहे जिथे घटस्फोटाची तरतूद नाही.
फिलीपिन्स या देशात घटस्फोटाची तरतूद नाही.
अहवालांनुसार, स्पेनने जवळजवळ 400 वर्षे फिलीपिन्सवर राज्य केले. या काळात तेथील बहुतेक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
फिलीपिन्स हा कॅथोलिक देशांच्या गटाचा भाग आहे. कॅथोलिक चर्चच्या प्रभावामुळे या देशात घटस्फोटाची तरतूद नाही.
जेव्हा फिलीपिन्सवर अमेरिकेचे राज्य होते, तेव्हा घटस्फोटासाठी एक कायदा तयार करण्यात आला. १९१७ च्या कायद्यानुसार, पती- पत्नीपैकी जर कोणीही व्याभिचार करत असेल तर घटस्फोट घेऊ शकतो.
दुसऱ्या महायुद्धात जेव्हा फिलीपिन्स जपानच्या ताब्यात होता, तेव्हा घटस्फोटासाठी एक नवीन कायदा देखील आणण्यात आला. १९४४ मध्ये अमेरिकेने पुन्हा सत्ता मिळवली तेव्हा जुना घटस्फोट कायदा लागू करण्यात आला.
१९५० मध्ये जेव्हा फिलीपिन्सला अमेरिकेच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा चर्चच्या प्रभावाखाली घटस्फोट कायदा मागे घेण्यात आला. तेव्हापासून घटस्फोटावर बंदी आहे.