ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील सर्वात संपन्न आणि सुंदर राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो.
महाराष्ट्रात फिरण्यासाठी अनेक हिल स्टेशन आहेत. यापैकी लोणावळा आणि खंडाळा हिल स्टेशन पर्यटकांना भुरळ घालते.
लोणावळा आणि खंडाळा हिल स्टेशनपेक्षाही सुंदर हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर हिल स्टेशन. येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
कडाक्याच्या उन्हात तुम्ही देखील थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लान करताय तर महाबळेश्वरला नक्की भेट द्या.
येथील हिरवेगार डोंगर पर्यटकांना आकर्षित करते. तसेच येथील मनमोहक दृश्ये, शांत वातावरण , स्ट्रॉबेरी फॉर्म आणि ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या.
एलिफंट हेड पॉईंट हे हत्तीच्या डोक्याच्या आकारातील एक डोंगर आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. या पॉईंटवरुन तुम्हाला अद्भुत नजारा पाहायला मिळेल.
येथील महाबळेश्नवर मंदिरला भेट द्यायला विसरु नका. हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात रुद्राक्षाच्या आकारात शिवलिंग आहे.
तुम्ही येथे बोटिंगसह वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.