Saam Tv
एकेकाळी खगोलीय वेधशाळा असलेले हे ठिकाण आज आंदोलनांचा केंद्रबिंदू मानले जाते.
जंतरमंतर ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा होती. जयपूरचे राजा महाराजा सवाई जयसिंग व्दितीय यांच्या आदेशानुसार इ.स.सन १७२४ मध्ये बांधण्यात आली.
जंतर याचा संस्कृतमध्ये अर्थ उपकरण / साधन, तर मंतर याचा संस्कृतमध्ये अर्थ गणना किंवा सल्ला असा होतो. याचाच अर्थ गणना करण्याची उपकरणे किंवा खगोलशास्त्रीय यंत्र.
जंतरमंतर हे पुर्णपणे दगड आणि चिनाईने बांधलेले आहे. भारतात आधुनिक दुर्बीणींचा प्रसार होण्यापूर्वी जंतरमंतर काळाची नोंद आणि प्रतिनिधीत्व करत होता.
जयसिंग यांना खगोलशास्त्राची आवड होती. ग्रह ताऱ्यांच्या स्थिती, वेळ मोजण्यासाठी, आणि कॅलेंडर,नौकानयन,पंचागमधील खगोलशास्त्रीय सारण्या सुधारण्यासाठी ही भव्य बांधकामाची निर्मिती करण्यात आली होती
अशा खगोलशाळा राजा महाराजा सवाई जयसिंग व्दितीय यांनी आणखी पाच ठिकाणी उभारल्या. दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी, मथुरा इ.
दिल्लीतील अनेक स्मारकांपेक्षा जंतरमंतरचा भौमितीक आकार बहुतेक ऐतिहासिक स्मारकांपेक्षा वेगळे आहे.
अनेक राजवाड्यांचे स्मारकात रूपांतर झाले तरी जंतरमंतर आपली एक वेगळी ओळख जपत दिल्लीत पाय रोवून उभा आहे.
याआधी निदर्शनेही इंडिया गेट परिसराजवळ व्हायची. काही काळानंतर जंतरमंतरचे देखील सार्वजनिक ठिकाणांमध्ये रुपांतर झाले. संसद आणि सरकारी कार्यालयांच्या जवळच असल्याने जंतरमंतर आंदोलनांचे केंद्रबिंदू बनले.