ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु झाला आहे. आता सर्वांचे फिरायला जाण्याचे प्लान बनतील
काहींचे धबधबाच्या ठिकाणी जाण्याचे प्लान बनतील, तर काही लोक फार्म हाऊसवर जातील
फार्म हाऊसमध्ये गेल्यावर तुम्हाला दिसेल की, स्विमिंग पुलच्या पाण्यात क्लोरिन टाकलं जातंय. मात्र क्लोरिन का टाकलं जातं?
स्विमिंग पूलच्या पाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर सूक्ष्मजीव असू शकतात. क्लोरिन हे एक प्रभावी जंतुनाशक आहे. क्लोरिन या सर्व जंतूंना नष्ट करून पाणी स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याचे काम करते.
स्विमिंग पूलच्या पाण्यात असणारी घाण, घाणेरडे पदार्थ आणि जैविक पदार्थ यामुळे पाण्याचा रंग ढगाळ होऊ शकतो आणि वास येऊ शकतो. क्लोरिन हे पदार्थ नष्ट करून पाणी स्वच्छ आणि रंगहीन ठेवते
क्लोरिन पाण्यातील शैवाल वाढण्यापासून प्रतिबंधित करते.
स्विमिंग पूलच्या पाण्यातील जंतूंमुळे त्वचेच्या आणि डोळ्यांच्या समस्यांचा त्रास होऊ शकतो.
क्लोरिन पाण्याचे पीएच स्तर संतुलित ठेवण्यास मदत करते.