Manasvi Choudhary
हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात आषाढ महिना अत्ंयत शुभ मानला जातो.
आषाढ या पवित्र महिन्यात पंढरीची वारी देखील निघते.
आषाढ महिन्यात नवीन नवरीला माहेरी पाठवण्याची प्रथा आहे.
असं मानलं जातं की आषाढ महिन्यात नवीन नवरीने आपल्या पतीचं तोंड पाहू नये.
जुन्या परंपरेनुसार, पूर्वी पावसाच्या दिवसात प्रवास करणे कठीण होते अशावेळी आषाढ महिन्यात नववधूला माहेरी पाठवत असे.
माहेरच्या वडिलधाऱ्यांच्या शुभ आशिर्वादासाठी देखील नववधूला लग्नानंतर आषाढ महिन्यात माहेरी पाठवायचे.
पावसाळ्यात दिवसात माहेरी आरामदायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी देखील नववधूला माहेरी पाठवायचे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.